धाराशिव  (प्रतिनिधी) - महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झालेले जयभीम प्रतिष्ठानचे सदस्य सनी बाळासाहेब नाईकवाडी यांचा वंचित बहुजन आघाडी व जयभीम प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे,जिल्हा नेते रमेश गंगावणे, बप्पा शिंदे,जयभीम प्रतिष्ठानचे आकाश बनसोडे, उत्सव समितीचे अध्यक्ष रोहितराज बनसोडे, रितेश बनसोडे, प्रतीक गंगावणे, चंदू बनसोडे, सागर वाळा, सिद्धार्थ गायकवाड आदींसह कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.

 
Top