धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीन गुरुदेव कार्यकर्त्यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न झाला.महाविद्यालयात हिंदी विभागांमध्ये कार्यरत असणारे हिंदी विभाग प्रमुख प्रा. श्रीराम नागरगोजे, शिक्षकेतर कर्मचारी श्री नागनाथ देशमुख ,श्रीमती उषा शेलार यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न झाला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णमूर्ती कायला हे लाभले होते. त्यांनी  सेवानिवृत्त गुरुदेव कार्यकर्त्यांना  शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते.  अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी खूप कष्ट ,यातना सहन करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यांच्यामुळे आपण खूपच सुखी आणि सुस्थितीमध्ये जीवन जगत आहात, अशा प्रकारचे सुख बापूजींच्या वाट्याला आले नाही.

प्रा. श्रीराम नागरगोजे ,श्री नागनाथ देशमुख, श्रीमती उषा शेलार यांनी बापूजींच्या स्वप्नातील गुरुदेव कार्यकर्ता कसा असला पाहिजे अशा प्रकारचे उत्तम कार्य केले आहे. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी सत्काराला  उत्तर देताना प्रा. श्रीराम नागरगोजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी प्रा.सौ. शुद्धमती फुलसागर, प्रा.माधव उगिले, नॅकचे सह समन्वयक प्रा. डॉ.संदीप देशमुख प्रा.डॉ. केशव क्षीरसागर, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी श्रीमती उषा शेलार यांचा सत्कार महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सौ विद्या देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.माधव उगिले यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा. मोहन राठोड यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top