भूम (प्रतिनिधी)- पंढरपूरहून आषाढी एकादशी यात्रा करून शेगावकडे परतीच्या मार्गाने निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दि. 25 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता शहरात आगमन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांच्यासह नगरपरिषद कर्मचारीच्या वतीने व गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
या पालखीचा शहरातील कुंतलगिरी रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात मुक्काम व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी शेगावहून पंढरपूर कडे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जाते. हे पालखी पंढरपूर वरून भूम मधून परतीच्या मार्गाने जाते .या पालखी सोहळ्यात 700 वारकरी असून 250 भगव्या पताका खांद्यावर घेऊन श्वेतवस्त्रधारी, 250 टाळकरी व 200 सेवेकारी असतात. यंदा पालखीचे 55 वे वर्ष आहे. श्री गजानन महाराजांची पालखी भूम शहरात शिवाजीनगर मार्गाने दाखल होताच भक्ताकडून श्री च्या पालखीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास हा पालखी सोहळा शहरातील आला. त्यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून गजानन महाराज मंदिरात मुक्काम होतो. तेथे भाविक भक्त दर्शन साठी गर्दीत होते. तसेच भूम शहरात ठिकठिकाणी शहरवासी यांच्या वतीने व व्यापाऱ्यांच्या वतीने या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते. एक दिवसाच्या मुक्कामात भजन, कीर्तन, महाप्रसाद आधी कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी दि. 26 जुलै रोजी पहाटे आरती झाल्यानंतर सकाळी कुंथलगिरी मार्गे सरमकुंडी फाट्याकडे पालखी मार्गस्थ होते. गजानन महाराज व्यापारी संघटनेच्यावतीने वारकऱ्यांचे सर्व सोय करण्यात येते.
श्री ची पालखी श्री शेत्र पंढरपूर येथून रविवारी दिनांक 21 जुलै रोजी परतीच्या प्रवासात निघून दिनांक 11 ऑगस्ट रोजी शेगाव येथे पोहोचते. हा पालखी सोहळा दोन महिन्यांचा असून यामध्ये तेराशे किमीचा वारकऱ्यांचा प्रवास राहतो. या पालखी सोहळ्यासोबत ॲम्बुलन्स डॉक्टर सहकारी राहतात. पालखीतील वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्या करता औषधोपचार केला जातो. वारकऱ्या करिता पिण्याच्या पाण्याकरता टँकरची व्यवस्था आहे.