धाराशिव (प्रतिनिधी)- रूपामाता उद्योग समुहाचे संस्थापक तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. व्यंकटराव गुंड हे तुळजापूर मतदारसंघातील समुद्रवाणी, लासोना, घुगी, मेंढा, नितळी, मुर्टा, होर्टी व किलज या गावतील शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक, युवक व बचत गटातील महिला सदस्य यांच्याशी थेट भेट घेत आहेत. त्यांचे स्थानिक प्रश्न जाणून घेऊन संबंधित समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास बैठकीद्वारे देण्यात येत आहे. 

शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी 'रूपामाता' नँचरल शुगर व उद्योग समुहाची स्थापना केल्याचे यावेळी गावबैठकी दरम्यान अँड. गुंड सांगून दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक म्हणून नको. मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास फायदेशीर आहे. त्यासाठी दुग्ध व्यवसायाचे शास्त्रोक्त ज्ञान घेऊन अधिकाधिक तरुण शेतकऱ्यांनी यामध्ये उतरावे. या व्यवसायात मोठी संधी असल्याचे सांगितले आहे. यासाठी रुपामाता डेअरी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी संबंधित गावातील शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक, युवक, महीला वर्ग व कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती व प्रतिसाद मिळत आहे.

 
Top