भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भूम परंडा वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा . डॉ . तानाजी सावंत यांनी तालुका भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन पदाधिकाऱ्याशी संवाद साधला. दरम्यान असंख्य कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील विकास कामाला मंजुरी देऊन निधी मिळावा अशा मागणीला जोर लावला . यावेळी नामदार सावंत यांनी देखिल प्रत्येक कामाला मंजुरी आणि निधी देखील मिळेल याची चिंता करू नका असा विश्वास दिला.

शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी भूम - परंडा - वाशी विधानसभा मतदार संघाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा .डॉ तानाजी सावंत यांनी भेटि दरम्यान तालुका भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला,  समस्यांची उकल करून घेतली. आज रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भूम येथे बैठक आयोजित केल्यानंतर त्यांनी भाजप तालुका कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे तालुका भाजपच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करून सत्कार केला.

या भेटीचा संदेश तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहीत नसताना मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटी  दरम्यान कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील कामा संदर्भात निधीची मागणी केली.  कामाला मंजूरी मिळण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांच्या मागणीला नामदार सावंत यांनी देखील तेवढाच विश्वास घेऊन एकही काम मंजुरीविना राहणार नाही असा विश्वास दिला. प्रत्येक कामाला मंजुरी देऊन निधी देखील मोठ्या प्रमाणात दिला जाईल असा आत्मविश्वास दिला.

बैठकी दरम्यान भाजपचे भूम - परंडा - वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,  भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर,  जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, विधीज्ञ संजय शाळू,  उद्योजक चंद्रकांत गवळी,  गजेंद्र धर्माधिकारी,  तालुका चिटणीस संतोष अवताडे, बाजार समिती संचालक विकास जालन, तालुका उपाध्यक्ष समाधान अंधारे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, मारुती चोबे, शांतीराज बोराडे, रघुनाथ वाघमोडे,  गजेंद्र धर्माधिकारीसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top