धाराशिव (प्रतिनिधी)-हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची 111 वी जयंती धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बहुजन जननायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि वसंतराव नाईक जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, डीवायएसपी स्वप्निल राठोड, सार्वजनिक बांधकाम अभियंता थोरात, शेषराव चव्हाण, नाईकवाडी, ॲड. विशाल साखरे उपस्थित होते. नायक आणि कारभारी, दहावी, बारावतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. काकासाहेब राठोड यांनी जयंतीचे औचित्य साधून दहावी, 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देवून गुणगौरव केला. तसेच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. निसर्ग संवर्धनासाठी 1001 वृक्षाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच शासकीय रूग्णालयातील रूग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप आडे यांनी तर प्रास्ताविक डॉ. काकासाहेब राठोड यांनी तर आभार संस्था उपाध्यक्ष बालाजी राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिवाजी आडे, घनश्याम राठोड, वंसत राठोड, राम चव्हाण, धनंजय रणदिवे, रावसाहेब राठोड, सारिका आडे, राजुदास राठोड, अरूण आडे, सचिन राठोड, अशोक जाधव, अनिल जाधव, ॲड. शरद राठोड, ॲड. राजुदास आडे, रामदास आडे आणि समिततील इतर सदस्य याचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी बंजारा समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 


 
Top