भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील नागोबा मंदिर येथे आरोग्य तपासणी  शिबिराचे आयोजन  तुळजाई प्रतिष्ठान व ग्रामीण रुग्णालय भूम तसेच नागोबा तरुण मंडळ यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबीर पार पडले. दरवर्षी आषाढी वारी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांसाठी सेवा आदिशक्ती श्री मुक्ताबाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर भव्य आरोग्य शिबिर तुळजाई प्रतिष्ठानचे विठ्ठल बाराते व टीम व ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स नर्स व अधिकारी व नागोबा तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली भूम शहरातील नागोबा मंदिर येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान व श्री क्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तीर्थक्षेत्रात वारकरी संप्रदाय व भजनी मंडळतील सदस्यांसाठी आरोग्य तपासणी  शिविर झाले. 

या शिबिरात विविध  प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.  तसेच औषधाचे वाटप करण्यात आले. ब्लडप्रेशर तपासणी शिबिरात, नेत्र तपासणी,कान, नाक, घसा, तपा तपासणी, चष्म्याचे वाटप व वारकऱ्यांसाठी पावसापासून रक्षण करण्यासाठी प्लास्टिकचे रेनकोट वाटप  करण्यात आले. शिबिरासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आवश्यक मनुष्यबळपाणी सोय करण्यात आली होती. या शिबिरामध्ये श्री संत मुक्ताबाई पालखी मधील हजारो वारकऱ्यांचे  रुग्णांची तपासणी करण्यात आली. खानदेश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागातून पारंपारिक पायी दिंड्या भूम मार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जातात. त्या वारकरी बांधवांची सेवा दरवर्षी भूमची वडीलधारी मंडळी अविरतपणे करत आहे. तोच वारसा आणि तोच धागा घेऊन आम्ही ही सेवा करीत आहोत. असे मत विठ्ठल आण्णा बाराते यांनी व्यक्त केले.

यावेळी शिबिराचे उद्घाटन भूम शहराचे तहसीलदार जयवंतराव पाटील, आर. व्ही. चकोर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती भूम के. डी. मुंडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी,ग्रामीण रुग्णालयचे अधीक्षक डॉ. सुदीप नाईकल, डॉ.आयशा खान, डॉ.आदम शेख आदी उपस्थित होते.


 
Top