उमरगा (प्रतिनिधी) - येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रमजीवी बी. फार्मशी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जी. पॅट व नायपर या राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या वतीने जी. पॅट व नायपर राष्ट्रीय परीक्षा देण्यासाठी माहे जून 2024 मध्ये देश स्तरावर परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत येथील श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे अमित दंडगे 773 तर करिष्मा चव्हाण 1492, दिनेश व्हनाळे 3048 या गुणानुक्रमे देश स्तरावरील गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला आहे. अंजिक्य जाधव, समृद्धी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी नायपर या  पात्रता परीक्षेत यश प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणा साठी केंद्र शासनाच्या वतीने विद्यावेतन देण्यात येणार आहे. एम. फार्मशी व पी. एचडी या पदव्युत्तर पुढील शिक्षणा साठी या विद्यार्थ्यांची  पात्रता निश्चित झाली आहे.

श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मशी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेत मिळविलेल्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील , सरचिटणीस तथा माजी मंत्री बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, सर्व संचालका सह प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंद केले आहे.

प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, उपप्राचार्या ज्योति आरसुडे - पेठकर, प्रा. रंगनाथ चव्हाण, प्रा. रोहित बाबशेट्टी, प्रा. चनबस शेटगार, प्रा. किरण चोपणे, प्रा. सुबोध कांबळे यांचे या यशस्वी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लागले. श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मशीच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम देशस्तरावरील शैक्षणिक गुणवत्तेचे यश प्राप्त केल्याने विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top