उमरगा (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 (बॅच - 1) संशोधन व विकास अंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यातील 40 किमीच्या 9 रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी सुमारे 58.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. सदर निधी उपलब्ध करण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
उमरगा व लोहारा तालुक्यातील 9 रस्त्याचे कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 (बॅच - 1) संशोधन व विकास अंतर्ग सुमारे 58.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील 40 किलोमीटर रस्त्याची सुधारणा होणार आहे. यामध्ये दाळींब ते विठ्ठलसाई कारखाना रस्ता ग्रामा 115 या 4 कि.मी रस्त्यासाठी 6 कोटी 80 लक्ष रुपये, रामा 548 बी मुरूम भुसणीवाडी - रामनगर - कंटेकूर रस्ता ग्रा.मा. 36 व इजिमा 106 चे 06.08 कि.मी. रस्त्यासाठी 9 कोटी 38 लक्ष रुपये, रामा 548 बी ते केसरजवळगा ते राज्य सरहदद रस्ता ग्रामा 110 चे 5.7 किमी साठी 7 कोटी 46 लक्ष रुपये, प्रजिमा 51 बेडगा ते चंडकाळ रस्ता ग्रामा 96 चे 3.5 कि.मी. साठी 4 कोटी 49 लक्ष रुपये, बेडगा ते मानेगोपाळ रस्ता ग्रा. मा. 95 चे 4.3 कि.मी. रस्त्यासाठी 5 कोटी 32 लक्ष रुपये, सावळसुर ते बोरी मातोळा रस्ता ग्रा.मा.43.20 या रस्त्याचे 4.5 कि.मी. कामासाठी 6 कोटी 87 लक्ष रुपये, कोरेगाव ते कोरगाववाडी रस्ता इजिमा 119 या रस्त्याचे 3.6 किमी चे कामासाठी 4 कोटी 96 लक्ष रुपये, हराळी ते करवंजी ग्रामा 55 या रस्त्याचे 3.8 कि.मी.साठी 5 कोटी 17 लक्ष रुपये, प्रजिमा 41 ते शीतलनगर ते आनंदनगर रस्ता ग्रा.मा.20 व 23 चे 4.8 कि.मी. रस्त्यासाठी 7 कोटी 78 लक्ष रुपयेचा निधीलाला 18 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.