धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील रिक्त असणाऱ्या मुख्याध्यापक पदावरती शिक्षक व प्राथमिक पदवीधर यांच्या मधून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर पदोन्नती करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी केली होती.

त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील रिक्त असणाऱ्या 53  पदावर मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पदोन्नती दिल्याबद्दल धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ व शिक्षणाधिकारी मा. अशोक पाटील यांचा सत्कार आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, अपंग विभाग जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोहिते, सुरेश वाघमोडे, आर. आर. पाटील, मोहन भोसले, मोहन लष्करे, आर. आर. पाटील, मुबारक पठाण,रमाकांत गुरव यांच्यासह सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

 
Top