धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथे राष्ट्रीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष बन्सी डोके व राष्ट्रीय सरचिटणीस संजय मिरगुडे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक धाराशिव येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये खालील पद नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय मराठा महासंघ प्रदेश उपाध्यक्ष वैभव नालेगावकर, राष्ट्रीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी उमेश दुरूंदे, मराठवाडा अध्यक्ष दत्ता भाऊ शिनगारे, मराठवाडा सचिव वैभव मगर, मराठवाडा संघटक देवानंद सुरवसे, धाराशिव जिल्हा प्रमुख संकेत सुर्यवंशी, बीड जिल्हा प्रमुख नंदकिशोर खांडे, नांदेड जिल्हा प्रमुख चंद्रकांत पवार, सातारा जिल्हा प्रमुख विक्रम वाघ, नाशिक जिल्हा प्रमुख सचिन राऊत, धाराशिव जिल्हा विधीज्ञ जिल्हा प्रमुख रामराजे साळुंके, जिल्हा संघटक नानासाहेब देवकर, धाराशिव अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख इलाज चौधरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई माने, धाराशिव जिल्हा संघटक वंदना साळुंके, जिल्हा सचिव सचिता कदम, जिल्हा उपप्रमुख शिवाजी टाळके, धाराशिव प्रवक्तापदी वैजीनाथ, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष खंडू राऊत, जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर काटे, जिल्हा चिटणीस किरण केदार, परांडा तालुका प्रमुखपदी सचिन पाटील, परांडा तालुका सचिव नितीन चौधरी, भूम युवक तालुकाप्रमुख तुषार पवार, पाथरूड शहरप्रमुख लहू बोराडे आदी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत.
तसेच या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पूर्ण ताकतीने उभे राहयचे आहे. आपापल्या जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांना पोषक असे वातावरण तयार करून त्यांच्या लढा हा राष्ट्रीय मराठा महासंघाचा लढा आहे, असा लढायचा आहे, अशी ग्वाही सर्वांना मते घेण्यात आली. त्याचबरोबर समाजातील इतर ही विषयावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायचे आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले.