भूम ( प्रतिनिधी)- ॲड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण बचाव यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात दि,28 जूलै रोजी येनार आहे यात परांडा येथे दुपारी दोन वाजता, भूम येथे सायंकाळी पाच वाजता, वाशी तालुक्यातील तेरखेडा सायं.सहा वाजता तर उस्मानाबाद येथे मुक्काम असणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी पत्रकार परिषदेत आज माहिती दिली. व कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहनही केले.
या पत्रकार परिषदेला बिभीषण खुणे समता परिषद निमंत्रक, आप्पासाहेब तरटे, शहाजी सोलंकर, प्रीतम शेळवणे, मुकुंद लगाडे यांच्यासह नेते उपस्थित होते
ओबीसी चे आरक्षण वाचले पाहिजे ,एससी एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ,ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा त्याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे ,एससी एसटी आणि ओबीसीला पदोन्नती मधील आरक्षण मिळाले पाहिजे, अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणारे आर्थिक मदत बंद आहे ती पूर्ववत केली पाहिजे व
महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर व सर्व टीम 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू झाली आहे चैत्यभूमीपासून ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार.
एकीकडे ओबीसी समाज प्रचंड घाबरलेला आहे. विशेषतः छोटा ओबीसी घटक घाबरलेला आहे. 12 दिवसांत लहान ओबीसी नेत्यांवर हल्ला झाला आहे. नाभिक समाजाची दुकाने जाळली आहेत. लहान ओबीसींच्या दुकानावर जायचे नाही, काही विकत घ्यायचे नाही असेही आदेश निघाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. ओबीसी नेत्यांनी , संघटनांनी सहभागी व्हावे शांतता प्रस्थापित करणे आणि जनजागृती करणे हा आरक्षण बचाव यात्रेचा हेतू आहे.
म्हणून या आरक्षण बचाव यात्रेमध्ये भूम तालुक्यातील एससी एसटी ओबीसी समाजातील सर्वांनी गोलाई चौक येथे उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी केले आहे.