नळदुर्ग (प्रतिनिधी)- आज नळदुर्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी समस्त हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा मध्ये हिंदू समाजाला भगवा दहशतवाद व सनातनी औलादी  अशा प्रकारची भाषा वापरून  सामाजिक सलोखा बिघडावणे व समस्त समाजाचा अपमानित करणा-या समाजकंटकांना तत्काळ अटक करावी व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावी. या मागणीचे निवेदन यावेळी अणदूर, नळदुर्ग, वागदरी, निलेगांव, काटगांव इटकळ,येवती इ. गावामधुन सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले. 

या निवेदनानंतर पोलिसांनी येणाऱ्या दोन  दिवसांमध्ये  सदरील  समाजकंटकांना त्वरीत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.  सकल हिंदू समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये अटक व जिल्हा हद्दपारची मागणी करण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यांना तात्काळ अटक न केल्यास समस्त हिंदू समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात येईल व धाराशिव जिल्हा बंद व संपूर्ण महाराष्ट्रभरातून आंदोलन  उभे करण्याचे  निवेदन यावेळी देण्यात आले आहे.

 
Top