धाराशिव (प्रतिनिधी)-  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धाराशिवच्यावतीने 270 वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाच मद्य प्राशन करणारे चालक आढळून आले.  त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी वायु वेग पथक ॲक्शन मोडमध्ये काम करीत आहे.

रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी सतत वाहनांच्या वेगाची तसेच वाहन चालविणाऱ्या चालकांकडे आवश्यक ते सर्व कागदपत्र सोबत बाळगलेली आहेत किंवा नाही तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे का याची पाहणी वायु वेग पथकाच्या माध्यमातून केली जाते.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायु वेग पथकाच्या अधिकाऱ्यांनी धाराशिव -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल नाका येथे 270 रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. या दरम्यान,270 वाहन चालविणाऱ्यांपैकी पाच जण मद्य प्राशन करून वाहन चालवीत असल्याचे निदर्शनास आले. 

ही धडाकेबाज कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, दत्तात्रय पांडकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार,सुजित वाघमारे,अक्षय बोदर,सोहेल मुजावर, वाहन चालक गोरख बोधले व निलेश खराडे यांनी केली.


 
Top