भूम (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा भूममध्ये गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी येणार आहे. व्यापारी सेवा मंडळाच्या वतीने या पालखी सोहळ्याची जोरदार तयारी झाली आहे. भूम शहरांमध्ये चौका-चौकात कमानी लावण्यात आले असून, भूम- कुंथलगरी रोडवरील गजानन महाराज मंदिरात पालखीतील वारकऱ्यांची सोय करण्यात येते. मंदिरामध्ये लाईटचे फोकस लावणे, मंदिरावरील विद्युत रोषणाई व इतर कामे व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहेत. पंढरपूरहुन आषाढी वारी यात्रा करून परतीच्या मार्गाने निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन भूम शहरात गुरुवारी होणार आहे. हा पालखी स्वरा आषाढी यात्रेसाठी शेगाव होऊन पंढरपूरकडे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातो. दर्शनानंतर ही पालखी पंढरपूर होऊन भूम मार्गावरून परतीच्या मार्गाने जाते. यासाठी भूम शहरातील नागरिक व व्यापारी सेवा मंडळ या पालखीचे सालाबाद प्रमाणे याही वर्षी भूम शहरात आल्यानंतर स्वागताची तयारी पूर्ण झाली असल्याचे दिलीप गाढवे महाराज व दीपक खराडे यांनी सांगितले.