तुळजापूर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार साधारण पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर म्हणजेच येत्या महिना अखेरीपूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील भाजपाचे एकमेव आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव सर्वाधीक चर्चत असल्याने अनेक वेळा विविध राजकिय समीकरण निर्माण झाल्याने हुलकावणी दिलेले मंञीपद आ. पाटील यांना आता तरी मिळणार काघ.? अशी चर्चा तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन चर्चली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री म्हणून तानाजी सावंत यांचा धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रभाव पडला नाही. विधानसभेचा कालावधी अवघ्या चार महिन्यांचा शिल्लक असल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी धाराशिव मराठवाडा विकासासाठी  मंत्रीपद  आवश्यक असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत. सिंह धाराशीव, जिल्हयाचा फोटोसह पोस्ट तालुक्यात व्हायरल होत आहेत. कार्यकर्त्यांना मंञीपदाची आतुरता लागल्याची दिसुन येत आहे. मंञीपद मिळाले तर तात्काळ कार्यकर्ते चाँर्ज होण्याची मोठी शक्यता आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार साधारण वर्षभरापासून रखडला आहे. हा विस्तार रखडण्याला अनेक कारणंदेखील आड आल्याचं सांगितले गेलं. तथापि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी राज्यातील विधानसभेची निवडणूक लक्षात येता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची चर्चा  आहे. यामध्ये तुळजापूर विधानसभा मतदार संघाला  मंत्रीपदाचा लॉटरी लागू शकते हे निश्चित मानलं जातंय. मागच्या अनेक वर्षात जिल्हयाला मंत्रीपद नसल्याने भाजप कार्यकर्त्यांत नाराजी निर्माण झाली आहे. एकेकाळी काँग्रेस अभेद बालेकिल्ला भाजपाचा बनविण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मोठे योगदान आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे संकट काळी भाजपच्या मदतीला आल्याने व उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांचे संबध आ. पाटील यांचे चांगले असल्याने यावेळी निश्चितपणे आ. पाटील यांना मंञीपद मिळेल असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे. 

 

 
Top