तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंभारी येथे राहत्या घराचे कुलुप तोडुन आत करुन प्रवेश कपाटातील सोने-चांदी दागिने व रोख 41 हजार रुपये असा एकुण 91 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवार दि. 21 जून रोजी राञी घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, कुंभारी येथील श्रीपती तळेकर यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने शुक्रवार दि. 21 जून रोजी राञी तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील अंदाजे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 41 हजार रूपये असा एकुण 91 हजार 500 रूपये किंमतीचा माल चोरुन नेला अशा दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top