तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री व एक सरचिटणीस यांनी शनिवार, रविवारी असेदोन दिवसात तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. मगच पक्षकाम सुरु केले. यात रावसाहेब दानवे दोन महिन्यात तीन वेळा तिर्थक्षेत्री येवुन  देवीदर्शन घेतले.

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी हे संघटनात्मक दौऱ्यावर आले असता शनिवार दि. 22 जून रोजी तर माजी  केंद्रीय मंञी अनुराग ठाकुर यांनी रविवार दि. 23 जून रोजी सपत्नीक देवीदर्शन घेतले. सलग दोन दिवसात तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकानंतर भाजप नेत्यांचा कल दर्शनाकडे वाढल्याचे दिसुन येत आहे. माजी केंद्रिय मंञी रावसाहेब दानवे मराठावाडा कार्यकर्ता संपर्क दौरा श्री तुळजाभवानी दर्शनाने प्रारंभ केला. तर सरचिटचिटणीस हे संघटनात्मक धाराशिव लोकसभा चिंतन दौऱ्यासाठी  आले असता देविदर्शन घेतले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी रविवारी सपत्नीक देवीदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अनिल काळे, प्रवीण पाठक, कोषाध्यक्ष नेताजी शिंदे सह भाजप पदाधिकारी उपस्थितीत होते.

 
Top