तुळजापूर (प्रतिनिधी)-  अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा धाराशिव यांच्यावतीने बुधवार दि. 26 जून रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मधील व्हीआयपी  पास भष्ट्राचार  विरोधात देवाचा नावाने पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोंब मारीत आंदोलन करण्यात आले.

यावेळी मंदिर संस्थांचे  प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार सोमनाथ माळी (वाडकर) यांनी या विषयी लवकर कारवाई करतो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सीसीटीव्ही चेक करून कारवाई केली जाईल असे लेखी स्वरूपाचे पत्र दिले आहे. यामुळे आजच्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले कि, व्हीआयपीची व्याख्या काय व ते कोन होवु शकतात असा सवाल करुन आमदार, खासदार सोबत जाणारे चाळीस कार्यकर्ते व्हीआयपी कसे असा सवाल केला. ज्या भाविकांनी व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी पाचशे रुपये दिले ते व्हीआयपी यादीत कसे आले. व्हीआयपीचे ओळखपञ तपासणी का होत नाही?  दोनशे रुपये पास काढणारे मंडळी पाचशे रुपये व्हीआयपी पास रांगेतुन सोडले कसे. पक्षाचे पदाधिकारी, नोकरदार, शेतकरी, व्यवसायीक व्हीआयपी कसा होवु शकतो असा सवाल या वेळी केला. तरी याची सीसीटीव्ही माध्यमातून तपासणी करुन दोषीवर,कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील, गणेश पाटील, आबासाहेब कापसे, चंद्रकांत गायकवाड, आनंद भालेराव, पंचअक्षरी चव्हाण, मीनाताई सोमाजी, पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

 
Top