धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर संलग्नित निळकंठेश्वर पशुधन व्यवस्थापक व दुग्धोत्पादक पदविका विद्यालय शिंगोली ता.जि.धाराशिव येथे 1 जून हा जागतिक दूध दिन तसेच दूध जागृती अभियान रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता, निम्न शिक्षण मपविवि नागपूर डॉ.अनिल भीकाने,सहयोगी अधिष्ठाता,डॉ.नंदकुमार गायकवाड,पवैम,उदगीर, समन्वयक डॉ. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य ऋषिकेश लोमटे हे होते. त्यांनी यावेळी बोलताना दूध सेवनाचे फायदे तसेच दुधाचे गुणधर्म सांगून 'दूध प्या व दीर्घायु व्हा' असा संदेश त्यांनी यावेळी दिला. 

या कार्यक्रमासाठी निळकंठेश्वर पशुधन व्यवस्थापक व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील डी.व बी.फार्मसी चे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे,आर.पी.कॉलेज ऑफ बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.गाजी शेख, बी.एस्सी.ॲग्रीचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील , व्यवस्थापक प्रा.हरि घाडगे, निळकंठेश्वर पशुधन व्यवस्थापक व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयाचे प्राचार्य श्री दळवे,व्याख्याता गादेकर,श्रीमती शिंदे ,बनसोडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार व प्रास्ताविक बालाजी वाघमारे यांनी मानले.

 
Top