धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने शेतकऱ्यांसाठी शिवार फेरी व ऊस पिक चर्चासत्र याचे आयोजन करण्यात आले होते. 

कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, कारखान्यापासून असणाऱ्या 40 किलोमीटर परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये जाऊन ऊस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी उसाचे बेणे मध्ये बदल करण्याचे असलेली गरज शुद्ध प्रतीचे बेणे टिशू कल्चरच रोपापासून बेने प्लॉट करून परिसरामध्ये शुद्ध प्रतीचा ऊस वाढविण्यासाठी आवर्जून प्रयत्न करणे, तसेच या दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे, त्याचबरोबर पाचटाचे आच्छादन केल्यामुळे पाणी बचत होऊन झिरो मशागत पद्धतीने खोडवा  उत्पादन घेणे, उसात येणारे रोग किडी यांचे निरीक्षण करून  त्यांचा बंदोबस्त करणे, शेतामध्ये जमिनीची सुपीकता सामू वाढवण्यासाठी आवर्जून गांडूळ खतासारखे तसेच कारखान्याद्वारे मिळणारे कंपोस्ट याचा वापर करणे, आपल्या जमिनीतील मातीचे योग्य प्रकारे माती नमुना घेऊन त्याचे माती परीक्षण करून कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या लॅब मध्ये माती परीक्षण करून घेणे, इत्यादी विषयावर सखोल असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

जेणेकरून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होऊन मिळणारा नफा यामध्ये निश्चित वाढ होईल यासाठी कारखान्याच्या वतीने जाणीवपूर्वक परिसरामध्ये मिळावे घेण्यात आले.या ऊस पिकाच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे  शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच वसंत दादा इन्स्टिट्यूट च्या वतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर  उपलब्ध असलेले उसासाठीचे उपयुक्त द्रवरूप खते इत्यादी कारखाना स्थळावरून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली.  शेतकरी वर्गामध्ये कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. ऊस उत्पादकाच्या हिताच्या दृष्टीने राबविलेला हा उपक्रम निश्चित फायद्याचा असल्याने शेतकरी बंधूंनी चांगला प्रतिसाद देत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न तसेच मराठवाडा भूषण श्री. अरविंद दादा गोरे साहेब यांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री शिनगारे ऊस विकास अधिकारी गुळवे तसेच संबंधित शेतकी मदतनीस यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून हे मिळावे संपन्न केले.या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन .चित्राव गोरे,

कारखान्याचे संचालक . निलेश  बारखडे पाटील, तसेच कारखान्याचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.हा कार्यक्रम शेतकरी याच्या हितासाठी असल्यामुळे या पुढील ही काळात चालू राहणार आहे.ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद दादा गोरे यांनी केली.

 
Top