तुळजापूर (प्रतिनिधी)- संस्कारक्षम ज्ञान बाजारात विकत मिळत नाही असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले. ते  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील प्रभारी प्राचार्य डॉ. यशवंतराव डोके हे तब्बल 37 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्याप्रसंगी बोलत होते.

शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम प्रारंभी संपन्न झाला. 

यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना कौस्तुभ गावडे पुढे म्हणाले की, शिक्षक हे गुणवान असतात, पण शिक्षकांच्या विचारसरणीचा पाया हा संस्कारक्षम असणे आवश्यक आहे. कारण आपण कितीही आधुनिक झालो तरी मानवतेचे शिक्षण हे संस्कारक्षम शिक्षकच देऊ शकतात. यावेळी प्राचार्य जयसिंग देशमुख, प्राचार्य डॉ. यशवंतराव डोके, महाविद्यालय विकास समिती सदस्य अशोक मगर, आप्पासाहेब पाटील, महेंद्र कावरे, डॉ आनंद मुळे, डॉ.सुयोग अमृतराव, डॉ.सागर डोके यांच्या सह इतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.सी आर दापके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धनंजय लोंढे,प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर,प्रा गोकुळ बाविस्कर यांचे उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा डॉ.मंत्री आर आडे यांनी मानले. सदर प्रसंगी डॉ डोके यांच्या कारकिर्दीतील माजी विद्यार्थी तसेच आजी विद्यार्थी, नातेवाईक, तसेच विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णमूर्ती, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे डॉ.संदीप देशमुख, डॉ.मच्छिंद्र नागरे यांच्या सह शहरातील सर्व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top