तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर येथे तालुक्यातील दहिवडीचे सुपुत्र डॉ. हिंमत बाबासाहेब गाटे, डॉ. अमीर मुलानी संचलित सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आय.सी.यु.सेंटरचे तुळजापूर येथील नवीन बसस्थानक जवळील कृष्णा लॉज शेजारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  रविवार दि. 23 जून रोजी उद्घाटन करण्यात आले.

 भुम-परंडा-वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, सचिन रोचकरी, विनोद गंगणे, देवानंद रोचकरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, कृषी  उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, विशाल रोचकरी, सुनिल रोचकरी, भाजपचे  तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, राजकुमार पाटील, आनंद कंदले, मिलिंद रोकडे, डॉ.कार्तिक यादव, ॲड.गणेश पाटील(दहिवडीकर), विलास  पाटील, सुरेश पाटील दहिवडीकर, संतोष अमृतराव, बाबासाहेब  गाटे, रविंद्र अंबुरे, संजय फंड, विजय  निंबाळकर, दहिवडी ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

तुळजापूर शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी या हॉस्पिटलचे खास वैशिष्ट्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली असून ज्यामध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग, 24 तास आपात्कालीन विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,  सुसज्ज अद्ययावत आयसीयू फुप्फुसांचे आजार, पोटाचे विकार, सर्पदंश, डायबिटीस, अस्थिरोग विभाग, ट्रामा केअर सेंटर, ऑपरेशन थिएटर, स्पेशल रूम अत्याधुनिक व्हेंटीलेटर, एक्स-रे सुविधा, ईसीजी, मल्टी पॅरामीटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, पॅथॉलॉजी लॅब,24 तास मेडिकल  थॉयराईड, दमा आणि टीबी, पॅरालेसिस, हृदयविकार, ॲलर्जी टेस्टिंग अशा विशेष सुविधाही सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली मिळणार असल्याची माहिती  डॉ.हिंमत गाटे व डॉ.अमीर मुलानी यांनी उपस्थित  मान्यवरांना  दिली.


तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिध्दीविनायक हॉस्पिटल पर्वणी ठरेल -माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

अद्ययावत सेवा सुविधा आणि परिपूर्ण असणारे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी निश्चितच तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्वणी ठरेल असे सांगून शुभेच्छा दिल्या.


गुणवत्तापूर्ण सेवा- सुविधा देत रुग्णांसाठी  24 तास सेवा द्यावी - सचिन रोचकरी 

तुळजापूर शहरात नव्याने सुरु  झालेल्या सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना गुणवत्ता पूर्ण सेवा-सुविधा देत 24 तास सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

 
Top