धाराशिव (प्रतिनिधी)-देवसिंगा (तुळ) येथील रुपामाता नँचरल शुगरच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक सभासद, बिगर सभासद यांचा ऊस प्राधान्याने व वेळेवर गाळप करण्यासाठी रुपामाता शुगर कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचे आवाहन केले. युवकांनी दुग्ध व्यवसायातुन अर्थकारण साधावे. यासाठी रुपामाता मिल्क पुढाकार घेईल असे ही रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक ॲड. व्यंकट गुंड यांनी सांगितले.

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील शेतकरी, ऊस व दुध उत्पादक, सुशिक्षित युवक व ग्रामस्थांशी बैठक घेऊन संवाद साधत येत्या हंगामातील ऊस गाळपाविषयी व परिसरातील विविध अडचणी संदर्भात ग्रामस्थांशी ॲड. गुंड यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी ॲड. गुंड व इतर सहकाऱ्यांचा शाल व फेटा बांधुन सत्कार केला.

यावेळी सरपंच मधुकर राठोड, सोसायटी चेअरमन बाबुराव भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मुसळे, प्रभाकर भोसले, शेतकरी शामराव मुसळे, महादेव भोसले, बापु पाटील, प्रविण पाटील, तुळशीराम एखंडे, संजय भोसले, शेतकरी शामराव मुसळे, रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, मुख्य शेतकी अधिकारी प्रेमनाथ पाटील, गजानन पाटील, राजेंद्र कापसे तसेच गावातील शेतकरी, ऊस उत्पादक, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top