परंडा (प्रतिनिधी)- लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करून प्रतिमा पूजन केले. नंतर परंडा शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, धाराशिव जिल्हा अध्यक्ष बि.डी.शिंदे, फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,तानाजी बनसोडे ,मराठा सेवा संघाचे गोरख मोरजकर, निशिकांत क्षीरसागर, राजकुमार देशमुख, समाधान खुळे ,नाना मोरे मेजर ,साहित्यिक तु.दा.गंगावणे, पांडुरंग मुसळे, विजयकुमार बनसोडे फिरोज तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी जिवा सेना जिल्हाध्यक्ष वंचितचे नेते नामदेव वाघमारे, युवा नेते नासीर शेख, अरुण गरड, उमेश कांबळे, परांडा तालुका अध्यक्ष तानाजी जाधव, शहराध्यक्ष किरण बनसोडे, तालुका महासचिव राहुल पवार, उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, प्रदिप परीहार, अरूण सोनवणे, गणेश सरवदे, नुरभाई मदारी आकी गायकवाड,अमोल शिंदे ,प्रकाश बनसोडे,किरण सोनवणे, अश्रू वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी फुले, आंबेडकर विद्वत सभेचे प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदरील मिरवणूक शहरातीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छ.शिवाजी महाराज चौक, हजरत टिपू सुलतान चौक, नगरपालिका, रेवनी भीमनगर, महात्मा फुले चौक, कल्याण सागर बँक मुख्य बाजारपेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणूक मध्ये विविध क्षेत्रातील अनेक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वंचीतचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.

 
Top