तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात पावसाच्या सततधारेमुळे मध्यम रानांचा वापसा होत नसल्यामुळे दमदार पाऊस होवुन खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना वापसाची वाट पहावी लागत आहे. तुळजापूर तालुक्यात 15 जुन 2024 पर्यत 222.04 मिमि म्हणजे सरासरीच्या पंचवीस टक्के पाऊस 17 जुन 2024 पर्यत पडला आहे.यापुर्वी पावसाअभावी पेरण्या रखडत होत्या. यंदा पावसामुळे रखडत असल्याचे चिञ दिसुन येत आहे.

शनिवार, रविवार पाऊस न पडल्याने या काळात या कालावधीत ज्यांचा रानांचा वापसा झाला आहे त्यांनी पेरणीस आरंभ केला. दोन दिवासाचा विश्रांती नंतर सोमवार दुपारी शहरासह परिसरास मुसळधार पावसाने झोडपुन काढल्याने पेरणी खोळंबल्या आहेत. वापसा न झालेल्या रानांमध्ये पेरण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. मात्र पाऊस पडल्यास पेरणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.तुळजापूर शहरात सोमवार दुपारी झालेल्या मुसळधार पावसात मंदिराचा पाठीमागील भागातील आराधवाडी मठा जवळील, बायपास पुला खालुन प्रचंड पाण्याचा ओघ चालु असतानाच या पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहन वाहुन जाताना अथक प्रयत्नानंतर वाहुन जाणारी दुचाकी युवकांनी वाचवली.

 
Top