तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील मंदिरालगत असणाऱ्या शुक्रवार पेठ भागातील ड्रेनेज लाईन वरील झाकणातुन सांडपाणी थेट मंदिराकडे जात असल्याने पावसाळ्या पुर्वीच्या शहरातील नालेसफाईच्या स्वच्छतेची पोलखोल झाली आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात सांडपाणी वाहुन जाण्यासाठी ड्रेनेज लाईन कार्यान्वित आहे. शुक्रवार पेठ भागातील रस्त्यावर असणारी  ड्रेनेज लाईनच्या झाकणातुन   सांडपाणी रस्त्यावर वरुन वाहत थेट मंदिराकडे जात होते. हे सांडपाणी व्यापारी वर्गाचा दुकाना समोरुन रात्री पर्यत वाहत राहिल्याने त्यांचा व्यवसायावर परिणाम झाला. तसेच येथील भाविकांना याच पाण्यातुन मंदिरात ये-जा करावी लागली. नुकताच  पावसाळा सुरु झाला असुन यापुढे शहरातील  ड्रेनेज लाईन काय काम करणार या बाबतीत शहरवासियांमधुन चिंता व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे स्वच्छता ठेकेदाराच्या स्वच्छतेचा कामा बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

 
Top