तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री. तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना चालक शेतकऱ्यांचे ऊसाचे देत नसल्याच्या निषेधार्थ बुधवार दि. 19 जून रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जुने  बस स्थानक समोरील चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी थकीत शेतकऱ्यांंचे पैस न दिल्यास 8 जुलै पासुन आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. यावेळी चारी बाजुने जाणारी वाहतुक रोखली गेली होती. यावेळी रस्ता रोको आंदोलन स्थळी येवुन महसुल अधिकाऱ्यांनी येवुन निवेदन स्विकारले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापूर  तालुक्यातील नळदुर्ग स्थित श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखानाने तालुक्यातील शेतकऱ्याचे अधाप  ऊसाचे बील मिळत येणाऱ्या खरीप पिकासाठी खत  बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे या बाबतीत  कारखान्याचे स्थानिक अधिकारी यांच्या व चौकशी केली तरी फोन बंद करतात, तसेच टाळाटाळ करत आहेत. याबाबत संदर्भीय अर्जान्वये निवेदने दिले. असताना त्याची दखल अद्यापपर्यंत प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे बिल तात्काळ देण्यात यावे, याकरीता हे रस्ता रोको आंदोलन केल्याचे निवेदनात म्हटले आहे,. दिनांक 05/07/2024 रोजीपर्यंत शेतकऱ्यांचे बील नाही दिल्यास दिनांक 08/07/2024 रोजी तहसिल कार्यालय तुळजापूर समोर अमरण उपोषण करण्यात येईलअसा इषारा ऊसउत्पादक शेतकरी अमोल शिवाजीराव जाधव यांनी दिला.

यावेळी  शिवसेना उबाठा  शहर अध्यक्ष सुधीर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय परमेश्वर, नगरसेवक राहुल खपले,नवनाथ जगताप, शरद जगदाळे, चंदु डांगे   शाम माळी, समाधान ढवळे, अमोल गवळी व शेतकरी कामगार उपस्थित होते.

 
Top