तुळजापूर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मंगळवार दि. 19 रोजी  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर  धाराशिव येथे तेली समाजाची व भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा संघटनेची बैठक घेऊन नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान झाल्याच्या शपथविधीच्या ठराव मंजूर केला. त्यानंतर धाराशिव वरून पुणेकडे जात असताना विजय चौधरी यांनी सुरतगाव येथील भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दादासाहेब घोडके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. दादासाहेब घोडके ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष: यांनी त्यांचे औक्षण करुन स्वागत केले. यावेळी गडाजी येळणे, राज सुरते, गामपंचायत सदस्य हरी जाधव, ज्ञानेश्वर घोडके, शिवाजी मगर इतर गावकरी उपस्थित होते.

 
Top