तुळजापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या मान्यतेने तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती दिगंबर खराडे,मसला (खुर्द) यांची आज -शरद पवार पक्षाच्या तुळजापुर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर व तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन तुळजापूर येथे दिगंबर खराडे यांना नियुक्तीपत्र देऊन पूढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते धनंजय पाटील, युवक कार्याध्यक्ष शरद जगदाळे,दयावान गवळी,राजेंद्र कदम आदी उपस्थीत होते. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची विचारधारा, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा व्यक्त केली.


 
Top