धाराशिव (प्रतिनिधी)-लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी शिवसेना उध्दव ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्रातून सर्वाधिक मते घेणारे दुसरे खासदार म्हणून इतिहास घडवला.

18 व्या लोकसभेतील खासदार यांचा शपथविधी आज दि. 25 जून 2024 रोजी लोकसभेमध्ये संपन्न झाला. 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा आज दि. 25 जून 2024 रोजी शपथग्रहण केली. लोकसभेचे अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी शपथ दिली. यावेळी लोकसमेतील सर्व नवनिर्वाचीत खासदार उपस्थीत होते.

 
Top