धाराशिव (प्रतिनिधी)-   धाराशिव जिल्ह्यातील वर्ग 2 मधील जमीनी वर्ग 1 मध्ये करण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मंगळवारी (दि.25) निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील सुमारे साडेबारा हजार एकर इनामी, मदत्मास, खिदमत मास सीलिंग जमिनी व महार वतन जमीन वर्ग 1 मधून वर्ग 2 मध्ये घेतल्यामुळे शेतकरी व प्लॉट धारकांवर मोठा अन्याय झालेला आहे. महाराष्ट्रात केवळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी व प्लॉटधारक हवालदिल झाले आहेत. याप्रकरणामध्ये प्रशासन व सरकार वेळकाढूपणा करत आहे. या निर्णयामुळे धाराशिव शहर व जिल्ह्यातील शेतकरी, प्लॉटधारक यांचे व्यवहार ठप्प झाले असून शेतकयांसह प्लॉटधारकांना कर्ज प्रकरणे करताना अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने विदर्भ आणि पश्चित महाराष्टात असाच निर्णय घेतला होता. तो शासनाने रद्दबादल केला. परंतू धाराशिव जिल्ह्याबाबत शासन ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यामुळे अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपण याप्रकरणी स्वत: लक्ष घालून वर्ग दोनमध्ये गेलेल्या जमीनी व प्लॉट वर्ग एकमध्ये करण्यासाठी तातडीने निर्णय घेवून अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या चार दिवसात शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

 
Top