भूम (प्रतिनिधी)-भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग साधना दिन साजरा साजरा करण्यात आला . या निमित्ताने योग शिबिर घेऊन विविध प्रकारचे योग करण्यात आले. शुक्रवार दिनांक 21 जून 2024  रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन असून सर्वत्र योग दिन साजरा केल्याच पहायला मिळाले.  हा योग दिन तालुका भाजपच्या संपर्क कार्यालयात देखील साजरा केला. या निमित्ताने असंख्य पदाधिकाऱ्यांनी सकाळी लवकर येऊन योग केले. 

भारतीय संस्कृतीमध्ये योग साधनेस खूप महत्त्व आहे. तन आणि मन यांचा एकत्रित मिलाप म्हणजेच योग होय. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी दैनंदिन योग करणे गरजेचे आहे. माजी सैनिक हेमंत देशमुख यांनी योगाचे प्रकार व त्याचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवत योग  करून घेतले. यावेळी भाजपाचे परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, प्रदीप साठे, माजी सैनिक शिवाजी चव्हाण, संदीप खामकर, रविकांत सूरवसे, दिनेश पौळ, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, सुजित वेदपाठक, शांतीराज बोराडे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शहरातील श्री गुरुदेव दत्त हायस्कूल येथे ही योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी योग्य शिक्षक महावीर बोपलकर यांनी योगा विषय माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्याकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय भालेराव, संस्था सचिव सतीश देशमुख यांच्यासह हायस्कूल मधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top