धाराशिव (प्रतिनिधी)-येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील हजारो विद्यार्थ्यांनी  योगाभ्यास केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक लक्ष्मण काकडे,  अतिथी डीसीबी बँकेचे शाखा व्यवस्थापक रणजीत शिंदे म्हणून उपस्थित होते.

योग गुरु लक्ष्मण काकडे यांनी विद्यार्थ्यांना योगासने प्रात्याक्षिकासह आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी असलेले महत्त्व विशद करून  योग - स्वयम और समाज के लिए योग ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची टॅगलाईन असल्याचे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम तर इ . 8 वी चे पर्यवेक्षक सुनील कोरडे, के.टी पाटील फाऊंडेशनचे प्रमुख उदयसिंह राजे, पर्यवेक्षक प्रा. विनोद आंबेवाडीकर तसेच डीसीबी बँकेचे कर्मचारी आणि विदयार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर यावेळी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आली.


 
Top