तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वटपौर्णिमा शुक्रवार दि.21 जून रोजी वडाचा झाडांचे पुजन महिलांनी करुन पारंपारिक पध्दतीने साजरी केली. वटपोर्णिमा निमित्ताने श्रीतुळजाभवानी मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली होती. वटपोर्णिमा निमित्ताने शहरातील जिथेजिथे वडवृक्ष आहेत तिथे महिलांनी जावुन वडाच्या झाडाचे मनोभावे पुजन केले. जेष्ट पोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ देविभक्तांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागात ही गावोगाव वडपुजन करुन वटपोर्णिमा साजरी केली.

 
Top