कळंब(प्रतिनीधी)- योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वतःच्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन हा जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 

त्या अनुषंगाने नगर परिषद कळंब येथे (दि.21) रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमिताने शहरातील नागरिक तसेच कार्यालयीन कर्मचारी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांच्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचे फायदे व महत्व या विषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कळंब नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी  राजू तापडिया यांनी केले. तर सदरील कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून योग शिक्षक संतोष हूरगट हे होते. या प्रसंगी उपस्थित कर्मचारी व नागरिक यांना योगासन, प्राणायाम, सूक्ष्मक्रिया याचे प्रकार, पद्धती व त्याचे मानवी शरीरासाठी फायदे याची माहिती देण्यात आली. व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. पुढे सांगताना संतोष हूरगट म्हणाले कि कोरोना कालावधीत नागरिकांना आपली प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अनेक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. नगर परिषद सफाई कर्मचारी हे आपल्या रोजच्या कामात व्यस्त आसतात. पण त्यांनी सुद्धा न चुकता रोज सकाळी काहीसा वेळ काढून योगासन, प्राणायाम, सूक्ष्मक्रिया ह्या कराव्यात.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम हरिभाऊ समुद्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नगर परिषद कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक एल एस वाघमारे,संजय हाजगुडे,शिवाजी केंद्रे,सुनील बनसोडे,चौदे,जगताप,मुंडे,माने,जगदाळे,जाफरआली सय्यद,अनिल हजारे,गवळी,ठोबरे,गरड,मस्के,जमील शेख,भैरू राखुंडे,महेश मुंडे,बाळू दुगाणे,हुसुलकर श्रीमती प्रजा गायकवाड, इतर सर्व नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला या आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जगताप यांनी केले.

 
Top