धाराशिव (प्रतिनिधी)- या सरकारच्या कामगिरीवर बोलायला गेलं तर 'येड्याची जत्रा व कारभारी सतरा' ही म्हण चपखल बसते. हे सरकारच बेकायदेशीर आहे त्यामुळे त्यांनी कितीही घोषणा केल्या तरी जनतेला त्यावर विश्वासच बसत नाही. आजवर नुसत्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच दिसलं नाही त्यामुळे यावेळी तरी काय वेगळं असणार? असा प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.

सद्याच सरकार हे सर्व पातळीवर अपयशी ठरल आहे. यामुळेच जनतेने यांना लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव केला. याचा धक्का बसल्याने आता सरकारला लोककल्याणाच्या योजना राबविण्याचे शहाणपण सुचलं आहे. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अश्या लोकप्रिय घोषनेचा अर्थ जनतेला चांगला कळतो. सरकारला याच घोषणा करायच्या होत्या तर या अगोदर त्यांना कोणी अडवलेलं नव्हतं पण कमिशन,गैरव्यवहार करण्यापासून त्यांना वेळच मिळाला नसल्याचा घणाघात खासदार राजे निंबाळकर यांनी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन केलेलं पाप धुण्याचीही संधी या सरकारने घालवली आहे असा टोलाही खासदार ओमराजे यांनी लगावला.

 
Top