धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील अक्षय नागरी सहकारी पतसंस्थेची 7 वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवारी (दि 23)रोजी सकाळी 11 वा.शिवगौरी फक्शंन हॉल येथे  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. 

या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून रुईभर येथील डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री. सुभाष दादा कोळगे यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष सतिश हिंगमीरे, संस्थेचे सचिव महादेव केसकर तसेच सर्व संचालक मंडळ, संस्थेचे कर्जविभाग प्रमुख सौ. वैशाली म्हेत्रे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे कर्मचारी कु. शिवानी मॅडम व वैष्णवी मॅडम यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव महादेव केसकर यांनी अहवाल वाचनात    सन 2023-2024 या आर्थिक वर्षाचे आर्थिक पत्रक जाहीर केले. या वेळेस संस्थेची 37.76 कोटी उलाढाल झाली असुन संस्थेमध्ये 4 कोटी ठेवी व 5.55 कोटी कर्जवाटप केले आहे. 100 तारणी कर्जवाटप आहे. 100 टक्के वसुली आहे. संस्थेस 15.27 लाख रु. नफा झाला आहे. संस्थेने पहिल्याच वर्षी 11 टक्के लाभांश वाटुन संस्थेने एक आदर्श निर्माण केला आहे.  संस्था दरवर्षी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करीत आहे  सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. कर्जाचा व्याजदर 14 टक्के असुन ठेवीचा 9.5 टक्के व्याजदर असल्याचे सचिव केसकर यांनी सांगितले. सभेस संस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top