धाराशिव (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण ' योजनेतून 2.5 कोटी महिलांना महिन्याला रू. 1500 देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील माता-भगिनींना या आधारासह सक्षम करण्यासाठी 25 लक्ष महिलांना लखपती दीदी करण्याचे देखील उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी सह सर्व प्रकारच्या व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी रू.5 हजार अनुदान, मागेल त्याला सौर पंप, गायीच्या दूधाला रू. 5 प्रती लिटरल अनुदान, कृषी पंपाची थकीत बिले माफ या सारख्या योजना जाहीर केल्याने महायुतीचे सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची बाब अधोरेखित होते.

वर्षभरात 10 लाख तरुणांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी दर महिना रू. 10 हजार विद्यावेतन व कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेऊन महायुतीचे शासन महिला, शेतकरी, युवक व गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याचे सिद्ध होते.

 
Top