धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील हजरत भैरुल्ला शाह कादरी आल्हे यांचा दि 26 व 27 रोजी मोठ्या उत्साहात उरूस संपन्न झाला. उरूस निमित्ताने जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी भरुल्ला शाह यांचे सालाबादा प्रमाणे दर्गाह शरीफवर जाऊन फुलाची चादर चढविली व दर्शन घेतले.

यावेळी उद्योजक अमित मोदाणी, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती सुदन पाटील, राजाभाऊ खोचरे, बाबासाहेब चव्हाण, नूर शेख आदी उपस्थित होते. दरम्यान उरूस कमिटीच्या वतीने संजय पाटील दुधगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष अल्ताफ मुजावर, मुश्रीफ मुजावर, जाकिर मुजावर, हरून कोतवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top