धाराशिव (प्रतिनिधी)- श्री सद्गुरू चैतन्यमहाराज देगलुरकर यांची प्रवचनमाला प्रथमच धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.

श्री सदगुरु धुंडामहाराज देगलुरकर सेवा प्रतिष्ठान, धाराशिव यांच्या वतीने धाराशिव येथे स्वयंवर मंगल कार्यालय येथे शनिवार दि. 8 व रविवार दि. 9 जून रोजी सायं 5 ते 8 या वेळेत दोन दिवस प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे.  श्री संत एकनाथ महाराजकृत चिरंजीव पद या विषयावर चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीतून श्रवण करण्याचा योग धाराशिव जिल्ह्यातील भाविकांना प्राप्त होणार आहे.  तरी सदर प्रवचनमाला कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन धुंडामहाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने संयोजक सुधाकर कुलकर्णी, सुर्यकांत कुलकर्णी, डॉ. अजित नायगांवकर, गिरीधर कुलकर्णी यांनी केले आहे.

 
Top