भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूल येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळेतील होतकरू व गरजवंत 31 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शाळेची माजी विद्यार्थिनी बारगजे रोहिणी सुधाकर या सध्या अमेरिकेमध्ये ड्रेस डिझाईनर आहेत. कै .सुधाकरराव बारगजे यांच्या स्मृती निमित्त त्यांच्या पत्नी व मुलगी रोहिणी यांच्या तर्फे गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी सचिव व पर्यवेक्षक सतीश देशमुख यांच्या हस्ते रोहिणी बारगजे व त्यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव  यांनी भूमिती विद्युत विभागाचे लाईनमेन लिमकर यांचा त्यांनी सत्कार केला.

 
Top