तुळजापूर (प्रतिनिधी)- छञपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्य अभिषेक सोहळा दिन सोहळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर भवानी तलवार अलंकार महापूजा गुरुवार दि. 6 जून रोजी मांडण्यात आली होती. शिवराज्य अभिषेक सोहळा पार्श्वभूमीवर प्रथमच ही  तुळजाभवानी देवीकडून भवानी तलवार स्वीकारताना छत्रपती शिवाजी महाराज अशी पूजा सिंहासनावर मांडण्यात आली होती. ही पुजा स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवराय यांना भवानी मातेने आशीर्वाद दिल्याचे मानले जाते.  अतिप्राचिन देवस्थानात एखाद्या राजाला थेट सिंहासनावर मुर्ती रुपात अधिष्ठान मिळणे हा योग दुर्मिळच आहे. यातूनच छत्रपती शिवाजी महाराज व भवानी माता यांच्यातील दृढ नाते स्पष्ट होते.

 
Top