धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिवच्यावतीने छत्रपती शिवाजी चौकात गुरुवारी दि. 6 जून रोजी 351 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

प्रारंभी समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर फुलांच्या माळांनी व गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवला होता. ढोल ताशांनी चौक दणाणून गेला. फटाक्यांची आतषबाजी करून व मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यामध्ये माजी अध्यक्ष आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, धनंजय राऊत, अनंत जगताप,  बालाजी तांबे, सिद्धार्थ बनसोडे, भालचंद्र कोकाटे, शहाजी भोसले, कुणाल निंबाळकर, मुकुंद घाडगे, राजेश बंडगर, आदित्य शिंदे, शिवराज कापसे ,अविनाश जाधव, ज्ञानेश्वर पंडित, शितल देशमुख, जयपाल शेरखाने, नानासाहेब बोराडे, चंद्रकांत इंगळे ,खंडू राऊत, किशोर राऊत, सौरभ गायकवाड, प्रमोद कोराळे ,चंद्रकांत इंगळे, सुरज जिंतपुरे, महेश उपासे, रुद्र भुतेकर, ओंकार बांगर आदीसह अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top