धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन दि. 21 जून रोजी योग गुरु हनुमंत भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.  

याप्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मार्गदर्शन करताना योग दिन साजरा करण्यामागचे महत्व विशद केले. योगामुळे शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. खऱ्या अर्थाने आरोग्यम्‌‍ धनसंपदा या म्हणीचा प्रत्यय येतो. आजच्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक युगात योग आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भारत जगात आपल्या संस्कृतीचा हा ठेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी सर्वांनी दैनंदिन योगाभ्यास करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.माने यांनी केले.  यावेळी योग गुरु भालेकर यांनी विविध योगासने, प्राणायाम याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचे विविध शारीरिक फायदे व महत्त्व विषद केले. सदर योगा डे साठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.  यावेळी संयोजक प्रा. प्रमोद तांबारे यांनी आभार प्रदर्शन करून योग शिबीराची सांगता केली.

 
Top