धाराशिव (प्रतिनिधी)- नीट परिक्षेतील पेपर फुटीसह निकालाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा आणि नीट युजीची परिक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

विद्यार्थ्यांनी नीट परिक्षेत घोटाळ्सयाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर. पी. कॉलेज, छत्रपती हायसकूल, महाजन महाविद्यालय व इतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच खासगी क्लासेसमधील शिक्षक मोर्चा सहभागी झाले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्या आला होता. धुळे-सोलापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. निवेदनात म्हटले आहे की, एनटीएने नीट परिक्षेचा निकाल 14 जूनला जाहीर होणार असल्याचे सांगून अचानक उत्तरपत्रिका प्रकाशित करत 4 जून रोजी निकाल जाहीर केला. त्यामुळे निवडणूक निकालात या घोटाळ्याला फार प्रसिध्दी मिळाली नाही. याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. एरवी नीट परिक्षेत क्वचित विद्यार्थ्यांना 720 गुण मिळतात. मात्र यावर्षी पेपर फुटीमुळे 67 जणांना 720 पडले आहेत. पहिल्या शंभर जणांची यादी एटीएने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली. त्यात 69 मुले हरियाणाच्या एकाच परीक्षा केंद्रातील आहेत. या सातही जणांनी त्यांची आडनावे लावली नाहीत. अर्ज भरतानाच ही काळजी घेतली होती. या पेपर फुटीची सीबीआयमार्फत चौकशी करून नीट-युजी परीक्षा पुन्हा घेत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य एन. आर. नन्नवरे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.


 
Top