भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील ईट येथील ऑक्सिजन पार्क मध्ये सोमवार दि.24 रोजी दुर्मिळ औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. येथील हुतात्मा स्मारक मंदिर व विवेकानंद वाचनालयामधील ' ऑक्सिजन पार्क ' मध्ये विविध प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

गतवर्षी येथील हुतात्मा स्मारक मंदिर व विवेकानंद वाचनालयाच्या पटांगणामध्ये अटल घन वन लागवड योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वृक्षांची, वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्येच दुर्मिळ औषधी वनस्पतींची नुकतीच लागवड करण्यात आली. या दुर्मिळ औषधी वनस्पती राहुरी येथील राहुरी कृषी विद्यापीठातून सामाजिक वनीकरण खात्याने उपलब्ध केल्या आहेत.

या वनस्पतींचा आयुर्वेदिक वनस्पती म्हणूनही पुढील काळात उपयोग होणार आहे. गेल्या ऑक्टोबर 2023 मध्ये या अटल घन वन ची सुरुवात करण्यात आली. आठ महिन्यांमध्येच ही सर्व झाडे बारा फुटाच्यावर गेलेली आहेत. या झाडांची जोपासना अतिशय तांत्रिकदृष्ट्या केल्यामुळे ही सर्व वृक्षवल्ली सशक्त व उंच नैसर्गिकरीत्या आलेली आहेत. याच मैदानात नुकतीच दुर्मिळ औषधी वनस्पती लावण्यात आलेली आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग होईल. या औषधी वनस्पती मध्ये अनुक्रमे ब्रह्मानंद, भुईमुळा, अडुळसा, सर्पगंधा, कपूर तुळस, कृष्णा तुळस, रक्त रोहिदा, शतावरी, मैन मुळा, रिटा, अर्जुन, ब्रह्मी, सीता, अशोक आदी औषधी वनस्पतींचा समावेश आहे. याप्रसंगी सामाजिक वनीकरणचे एस.एस.कांबळे तसेच माजी सभापती प्रताप देशमुख, सरपंच संजय असलकर, युवा सेना भुम तालुका प्रमुख निलेश चव्हाण, वृक्ष चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते संदिपान कोकाटे व वनीकरण कर्मचारी आनंद ठोंबरे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top