धाराशिव (प्रतिनिधी)- दुधाचे दर 29 रुपयावरुन 27 रुपये लिटरपर्यंत खाली आले आहेत. ते पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मागील दोन वर्षापासून जिल्ह्यामध्ये कधी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तर या वर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. उर्वरीत पाच तालुके दुष्काळग्रस्त असल्याने पाणी, अवकाळी पाऊस, चारा, महागाई याने त्रस्त झालेले आहेत. असे असताना दुष्काळाचे अनुदान मिळालेले नाही. सन 2023 चा पीकविमा सरसगट मिळालेला नाही, शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस घालून तीन महिने झाले त्याचे पहिले बील जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी शेतकयांना दिलेले नाही. त्याचप्रमाणे येत्या 20 दिवसांवर पेरणी आलेली असताना शेतकरी आर्थीक संकटात असताना शेती मालाला भाव नसल्याने मे 2024 महिन्यात जिल्ह्यामध्ये 19 शेतकऱ्यांनी आर्थीक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा पूरक असणारा दुग्ध व्यवसाय गेल्या वर्षभरामध्ये दुधाचे दर 10 रुपयाने कमी झालेले असताना दुधाचे दर 29 रुपयांवरुन 27 रुपये झाले आहेत. 

 
Top