भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील गिरवली येथे इफ्को इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर को. लि.यांच्या वतीने इफ्को नॅनो खते ड्रोन फवारणी योजनेचा शुभारंभ परांडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे  माजी आमदार राहुल मोटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

ड्रोन द्वारे फवारणी करून मनुष्यबळ आणि वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात टेकनॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादनामध्ये वाढ करावी असे यावेळी राहुल मोटे म्हणाले. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर मोटे, ॲड. रणजित मोटे, महाराष्ट्र राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, संचालिका डॉ.वर्षा दस्तुरकर, सहित गिरवली, डोकेवाडी सोंनेवाडी परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top