धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती, श्रीमती सुशिलादेवी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे समन्वयक डॉ.डी.एम.शिंदे  आदींच्या शुभहस्ते महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगिले, प्रा.बालाजी नगरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जीवन पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा .डॉ.एस.एस. फुलसागर, सहसमन्वयक प्रा.डॉ. संदिप देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रा. स्वाती बैनवाड,प्रा. स्वाती आकोसकर, प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे , मराठी विभागप्रमुख डॉ. शिवाजी गायकवाड आदींबरोबरच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top